0


सुभाष देसाई यांच्या राजीनामा मागणीप्रकरणी वेगळी भूमिका 
मुंबई – एकीकडे सत्तेत सहभागी व्हायचे ,दुसरीकडे मित्रपक्षालाच गारद करण्यासाठी राजीनामे खिशात असल्याची दटावणी करणाऱ्या शिवसेनेने आता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनामा मागणीप्रकरणी वेगळी भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे सुभाष देसाईंची पाठराखण करताना केवळ आरोप करायचे आणि राजीनामे घ्यायचे, हा पायंडा राज्यासाठी हिताचा नाही, हा मुद्दाही रेटला असला तरी मित्रपक्ष भाजपने त्यांना या प्रकरणात सावरले आहे.

भ्रष्टाचाराने बरबटलेल्या विरोधकांनी ज्या पद्धतीने आरोप केले आणि चिखल उडवला, ही गोष्ट लांच्छनास्पद आहे. आरोप करणारे हे स्वत: भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये गुंतले आहेत. हे घोटाळेबाज लोक तोंड वर करुन आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, ही गोष्ट लाजिरवाणी असल्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडत केवळ आरोप करायचे आणि राजीनामे घ्यायचे, हा पायंडा राज्यासाठी हिताचा नाही,अशा शब्दात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची पाठराखण केली आहे. शिवाय या प्रकरणी माझे मुख्यमंत्र्यांशीही बोलणे झाले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले की, ‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशी विरोधकांची प्रवृत्ती आहे. या सगळ्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यामुळे आता स्वत:च्या बचावासाठी सर्व विरोधक आक्रमकतेचा आव आणत आहेत. या दबावाला बळी पडता कामा नये. त्यामुळे विरोधकांनी आरोप केले असतील तर आपण त्याची आरोपांची चौकशी करू. जे काही सत्य असेल ते जनतेसमोर येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याची माहिती उद्धव यांनी दिली.

Post a Comment

 
Top