0



मुंबई – जनलोकपालच्या आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेले आणि ‘पतंजली’ च्या माध्यमातून देशाच्याच काय विदेशातील घराघरात पोहचलेल्या योगगुरू बाबा रामदेव यांच्या जीवनावरील आधारित पुस्तकाच्या विक्रीला दिल्लीतील न्यायालयाने स्थगिती दिल्याने बाबा रामदेव यांच्या मनसुब्यांना ‘ घरघर ‘ लागल्याचे अधोरेखित झाले आहे.

योगगुरु बाबा रामदेव यांच्या जीवनावर आधारित ‘गॉडमॅन टू टायकून : द अनटोल्ड स्टोरी ऑफ बाबा रामदेव ‘ पुस्तक लिहित असताना मी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची भेट घेतली होती. त्यांची भेट घेताना ते एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच भेटले. या पुस्तकात त्यांच्या जन्मापासून ते पतंजलीसारखी एक आयुर्वैदिक कंपनी सुरू करून यशस्वी करण्याबाबतचा प्रवास उलगडण्यात आला आहे. पुस्तकामध्ये बाबा रामदेव यांचे सहकारी बाळकृष्ण इतरांबद्दलही सांगण्यात आले आहे असे या पुस्तकाच्या लेखिका व पत्रकार प्रियांका पाठक नारायण यांनी सांगितले शिवाय न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का नसल्याचेही नमूद केले. प्रकाशक किंवा लेखकाची बाजू ऐकून न घेताच पुस्तकाच्या प्रकाशन आणि विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे, असे जगरनॉट बुक्सने पत्रकारांशी बोलताना सांगितले. न्यायालयाने १० ऑगस्ट रोजी हा निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रकाशकांनी सांगितले.

Post a Comment

 
Top