0


नवी दिल्ली – काल-परवापर्यंत गळ्यात गळे घालून सत्तेचे समीकरण बनविणारे आज मात्र एकमेकांचे पक्के वैरी झाल्याने ‘सत्तेच्या सारीपाटा’त कधीही काही होऊ शकते याचा प्रत्यय बिहारमधील जनता अनुभवत आहे. त्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांना एनडीएमध्ये येण्याचे रितसर आमंत्रणच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्याने राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यांचे पित्तच खवळले आहे.

कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना नितीशकुमार शिव्या द्यायचे आता बघा त्यांच्यासमोरच कसे झुकले आहेत, अशी टीका लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.नितीशकुमार हे भाजपमध्ये गेल्यात जमा आहेत. मला वाटत नाही की ते जदयू या आपल्या पक्षात राहतील अशी टीकाही लालूप्रसाद यादव यांनी वृतसंस्थेशी बोलताना केली आहे.परिणामी कालपर्यंत देशाच्या राजकारणात ‘दो हंसो का जोडा’ म्हणून लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांची जोडी प्रसिद्ध होती. आता मात्र या दोघांचे संबंध कमालीचे विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
Next
Newer Post
Previous
This is the last post.

Post a Comment

 
Top